PostImage

Sanket dhoke

Dec. 28, 2023   

PostImage

Weather News ; येत्या ४८ तासात महाराष्ट्रात थंडीची लाट


नागपूर : राजधानी दिल्ली सह जवळपास सर्वच शहरांवर कमीअधिक प्रमाणात धुक्याची चादर पसरलेली आहे. सगळीकडे थंडीची लाट आलेली असून हवामानात मोठा बदल झाल्याचे दिसून येत आहे. पुढील तीन- चार दिवस धुक्याची चादर अशीच कायम राहील आणि थंडीची लाट देखील कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

 

थंडी आणि धुक्याची तीव्रता अधिक असणाऱ्या ठिकाणी शाळांच्या वेळांत देखील बदल करण्यात आलेला आहेत. गाझियाबाद, मथुरा, अलिगढ यासारख्या ठिकाणी शाळांच्या वेळा मध्ये बदल करण्यात आला आहेत. तर काही ठिकाणी थंडी आणि धुक्याच्या तीव्र लाटेचा इशारा देण्यात आल्याने शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्रा मध्ये सुद्धा पुढील ४८ तासांत राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्या वर अधिक परिणाम जाणवणार आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याची काही शहरे गारठण्याची देखील शक्यता आहे.

 

पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रा मध्ये देखील थंडीचा प्रभाव वाढणार असून राजधानी मुंबईत गुलाबी थंडी पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे. महाराष्ट्रा मधील वातावरणात सतत बदल होत असून कधीही थंडी तर मध्येच आभाळ येऊन थंडीची तीव्रता कमी झालेली पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात विशेषतः विदर्भात अनेक शहरांमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षाही खाली गेलेले होते. तर महाराष्ट्रा मधील उर्वरीत शहरांमध्ये किमान तापमानाचा पारा १५ अंश सेल्सिअसच्या आसपास होते. मागील ४ दिवसां पासून धुक्याची चादर सर्वत्र पसरली आहे. तर मध्येच उकाडा देखील जाणवत आहे. मात्र, आता हवामान खात्याने पुढील दोन दिवसात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे

 

*अशाच बातम्य साठी what's app ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर  क्लिक करा.*

               

https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW

 

 

*जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*

☎️ : _७७५८९८६७९८_

 

*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*